आयसीएमआर-निटवार (ICMR-NITVAR) पुणे येथे 'कन्सलटंट मेडिकल' पदासाठी मोठी भरती; ८ जूनपर्यंत अर्ज करण्याची शेवटची संधी!
- जाहिरात -
पुण्याच्या मेडिकल क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' (ICMR) च्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रिटमेंट ऑफ व्हायरल डिसीजेस अँड रिसर्च (NITVAR) विभागात रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
महत्त्वाचे तपशील पुढीलप्रमाणे:
• पद: कन्सलटंट (मेडिकल) - Consultant (Medical)
• एकूण जागा: ०१
• पात्रता (Qualification): MBBS, BVSC किंवा MVSC पदवीधारक या पदासाठी अर्ज करू शकतात.
• जाहिरात क्रमांक: 44/NITVAR/Project Cell/2026-27
• अर्जाची शेवटची तारीख: ०८ जून २०२६
इच्छुक उमेदवारांनी ही संधी गमावू नये. ही भरती 'Project Cell' अंतर्गत असून कराराच्या स्वरूपात असण्याची शक्यता आहे. अधिकृत तपशील आणि अर्जासाठी ICMR च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- विज्ञापन -
- जाहिरात -